आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र दिनी अनेक पक्षांचे नेते माध्यमांसमोर आपली टीमकी वाजवित असतानाच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही राजकीय शत्रू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले. ''जे बाळासाहेबांनी कमावलं ते उद्धव ठाकरेंनी गमावलं'' अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तर त्यांचे पूत्र आणि भाजप नेते नितेश राणे यांनी बाबरी मशिद पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते? असा सवाल करून त्यांच्यावर बोचरी टीका केली.
शिवसेना, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी नारायण राणे यांचे राजकीय वैमनस्य सर्वश्रूत आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी नारायण राणे आणि त्यांची दोन मुले सोडत नाही. राज्यात हिंदुत्वावरून राजकारण तापले असतानाच नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
बाळासाहेबांच्या गुणचरित्रांवर काही करायची नैतिकता उद्धव ठाकरेंकडे नाही. बाळासाहेबांनी जे कमावले ते उद्धव ठाकरे यांनी गमावले असे नारायण राणे म्हणाले.
लोकांना काही तरी देण्यासारखे बोला
आज महाराष्ट्र राज्याचा 61 वा स्थापना दिवस आहे पण मुख्यमंत्री ठाकरे काय बोलतात? गरीबी, निरक्षतता, दरडोई उत्पन्न यात आपली स्थिती गंभीर आहे. दरडोई उत्पन्नात राज्य देशात 13 व्या क्रमांकावर आहे, अशी स्थिती असताना मुख्यमंत्र्यांनी लोकांना काही तरी देण्यासारखे बोलावे. प्रगत राज्य हा नावलौकिक असतानाही राज्याची अशी स्थिती असेल तर मुख्यमंत्री पदही उद्धव ठाकरेंना शोभत नाही अशी टीकाही त्यांनी केली.
बाबरी पाडले तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते?
बाबरी पाडली तेव्हा राज ठाकरे आणि भाजपवाले कुठे होते असे उद्धव ठाकरे विचारतात पण मी म्हणतो की, बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते ते मातोश्रीवर कॅमेरे साफ करीत बसले होते अशी जळजळीत टीका नितेश राणे यांनी केली. आमच्यावर टीका करायची. वाईट बोलायचे अशी त्यांची निती आहे असेही नितेश राणे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.