आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरे गाफिल नव्हते. त्यांना विश्वासू लोकांनी धोका दिला. आम्हालाही या बंडाचा सुगावा लागला होता. रात्रीच्या अंधारात लपुनछपून काही लोक भेटत होते. दिल्लीत मोठ्या हालचाली सुरु होत्या. असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
प्रसारमाध्यमांशी आपला रोजचा संवाद साधताना पुढे संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून जिंकायचे आहे हे ठरल्यावर शिवसेनेने त्यागाची भूमिका ठेवली. नुकत्याच लागलेल्या निकालात समोर आले आहे की, 5 पैकी 4 जागा मविआकडे आहेत. अमरावती आणि नागपूर या दोन जागा आम्ही एकीमुळे जिंकू शकलो. कसबा-चिंचवड आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढू.
त्याच स्पिरीटने लढू
पुढे संजय राऊत म्हणाले, चिंचवडच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह आहे. मात्र कसबा व चिंचवड या दोन्ही ठिकाणी कोणाचे निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानुसार निर्णय घेतला जाईल. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद, रस्सीखेच नाही. महाविकास आघाडीने जिंकणे हे एकमेव ध्येय आहे. कसबा, पिंपरी, चिंचवड याठिकाणी आम्ही त्याच स्पिरीटने लढू.
भराडी देवीने शिवसेनेला पाठिंबा दिला
भाजपच्या शक्तीप्रदर्शनावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, शक्तीप्रदर्शनाने देवी पावत नाही. कोकणाकल्या भराडी देवीने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचा जन्म तळकोकणातून झालाय. भराडी देवीचे मांगल्य आम्हाला ठाऊक आहे. पैशाचे खेळ करुन देवस्थाने ताब्यात घेता येत नाही. असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला.
ठाकरे गाफिल नव्हते
अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, अजित पवार यांचे म्हणणे त्यांनी वारंवार आमच्याकडे सांगितले आहे. गाफिल राहिले म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंना विश्वासू लोकांनी धोका दिला. त्यावेळी आम्हालाही बंडाचा सुगावा लागला होता. मात्र आपल्या लोकांवर अविश्वास दाखवायला नको. असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे होते. असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
शिंदे चॅलेंज स्विकारा
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केलेल्या आव्हानाविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, 32 वर्षांचा तरुण आदित्य ठाकरे तुम्हाला आव्हान देत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते स्विकारावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःला क्रांतिकारी म्हणतात. फार मोठी क्रांती केली असे म्हणता. तर क्रांतिकारकांनी घाबरायचे नसते. निडरपणे सामोरे जायचे असते.
कोर्टात यावेच लागेल
संजय राऊत म्हणाले, नारायण राणेंना आत्तापर्यंत मी काही बोललो नाही. ते करत असलेल्या विधानांमध्ये तथ्य नाही. वादग्रस्त वक्तव्य ही त्यांची विकृती आहे. मात्र आता त्यांना कोर्टात यावेच लागेल. शिवसेनेबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यांवर स्पष्टीकरण द्यावे लागेल. केंद्रीय मंत्री इतके खोटे कसे बोलू शकतो. आणि मोदीजी त्यांना आपल्या सोबत कसे ठेवतात? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
संबंधित वृत्त
आदित्य ठाकरे यांचे CM एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज
मी राजीनामा देतो. हिंमत असेल तर तुम्हीही राजीनामा देऊन मैदानात या. वरळीतून उभे राहा. तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणारच. असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. आता एकनाथ शिंदे याला कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.