आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टोलेबाजी:आम्ही विचार केला त्यापेक्षा ते जास्तच 'नॉटी' निघाले; अमृता फडणवीस यांचा संजय राऊतांना टोला

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राऊत यांनी कंगनावर टीका करताना हरामखोर म्हटले होते, नंतर असे दिले स्पष्टीकरण

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर टीका करताना हरामखोर म्हटले म्हटले होते. यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. यानंतर राऊत यांनी त्यांच्या भाषेत हरामखोर शब्दाचा अर्थ सांगत स्पष्टीकरण दिले होते. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत नाव न घेता राऊतांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

महाराष्ट्रात हरामखोरचा अर्थ नॉटी असा होतो. बेईमान असा होतो. आमच्या मते कंगना दोन्ही आहे. माझ्या मते ती नॉटी गर्ल आहे. ती नेहमीच मजाक मस्करी करत असते हे मी पाहिले आहे. मुंबईत राहणारी कोणतीही मुलगी देश, महाराष्ट्र आणि मुंबईबाबत काहीही बरळत असेल तर माझ्या मते ती बेईमानच आहे, असे राऊतांनी स्पष्टीकरण दिले होते.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

संजय राऊत यांनी हरामखोर शब्दावर दिलेल्या स्पष्टीकरणावर अमृता फडणवीस यांनी ट्विट केले. आम्ही विचार केला त्यापेक्षा ते जास्त नॉटी आहेत, असे म्हणत अमृता फडणवीसांनी राऊतांनी नॉटी शब्दावर दिलेल्या स्पष्टीकरणावर निशाणा साधला.

याआधीही अमृता यांनी कंगनाला अप्रत्यक्षपणे पाठींबा दिला होता.

दरम्यान अमृता यांनी याआधीही कंगनाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला होता. आपण एखाद्याच्या मताशी सहमत असू शकत नाही, मात्र लोकशाहीने प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे. व्यक्त होण्याचे, चळवळ करण्याचे स्वातंत्र कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले होते.