आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागात महिनाभरात २८ हजार जागा भरणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'लॉकडाऊनच्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणा मजबूत करणे हे आमचे ध्येय'

सार्वजनिक आरोग्य विभागात रिक्त असलेल्या १७ हजार ३३७ आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील ११ हजार जागा अशा एकूण २८,३३७ भरण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याने या जागा परीक्षा न घेता महिन्याभरात भरल्या जातील, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून वैद्यकीय विभागातील कर्मचारी सतत काम करीत आहेत. ते थकल्यावर नवीन टीम असावी, रिक्त जागा असू नयेत, याची खबरदारी घेऊन जागा भरण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.  लॉकडाऊनच्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणा मजबूत करणे हे आमचे ध्येय आहे. त्यामुळे परीक्षा न घेता त्यांच्या जुन्या ज्या परीक्षा असतील जसे नर्सिंग कौन्सिल, एमबीबीएसची झालेली परीक्षा, पीजीचे गुण या आधारावर जागा भरल्या जातील,असे ते म्हणाले. 

राज्यात २.५ लाख पदे िरक्त

राज्य शासनाच्या  प्रशासकीय विभागात सुमारे २.५ लाख पदे रिक्त आहेत.  ही रिक्त पदे त्वरित भरावीत आणि सेवानिवृत्तीचे वय केंद्रानुसार ६० करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे. वित्त विभाग ६ हजार, कृषी- पशुसंवर्धन विभाग १४ हजार, सार्वजनिक बांधकाम  ९ हजार, जलसंपदा  २१ हजार,महसूल  ८ हजार, पोलीस २० हजार आणि आरोग्य विभागात २१ हजार पदे रिक्त आहेत, अशी माहिती महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी शुक्रवारी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...