आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव:रस्ते विकास महामंडळातर्फे आरोग्य शिबिर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने राजीव गांधी वांद्रे वरळी सागरी सेतूवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. देशातील पहिला सागरी सेतू १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वजाच्या तीन रंगांनी उजळून निघाला. राज्यात ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव हा उपक्रम राबवण्यात आला. त्या अंतर्गत वांद्रे वरळी सागरी सेतूवर विद्युत रोषणाई करण्यात आली. आरोग्य शिबिर स्वराज्य महोत्सव अंतर्गत महामंडळाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले. एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या सहयोगाने झालेल्या या शिबिराचा १५० हून अधिक जणांनी लाभ घेतला. या शिबिरात रक्त तपासणी, नेत्र तपासणी व ईसीजी तपासण्या करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...