आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारा आग दुर्घटना:कंत्राटी बालरोग तज्ज्ञ, नर्स बडतर्फ; सिव्हिल सर्जन, वैद्यकीय अधिकारी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या दुर्घटनेतून बोध घेऊन राज्य शासनामार्फत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांचे 15 दिवसांत आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे

भंडारा जिल्हा रुग्णालयातील भीषण जळीतकांडप्रकरणी कंत्राटी बालरोगतज्ज्ञ आणि दोन नर्सना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून जिल्हा शल्यचिकित्सक प्रमोद खंडाते यांना निलंबित करण्यात आले असून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांची बदली तर एसएनसीयूच्या विभागप्रमुख तसेच परिसेविका यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी सांगितले.

या दुर्घटनेतून बोध घेऊन राज्य शासनामार्फत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांचे १५ दिवसांत आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी यांच्या समितीचा अहवाल आल्यावर कृती आराखडा तयार करण्यात येईल. दहा तान्हुल्यांचा बळी घेणाऱ्या आगीच्या दुर्दैवी घटनेच्या चौकशीसाठी नागपूरचे विभागीय आयुक्त संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीच्या अभिप्रायानुसार शिशू केअर युनिटच्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आग लागल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.

यांच्यावर कारवाई

भंडारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांना निलंबित, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनीला बडे यांची अकार्यकारी पदावर बदली, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना मेश्राम व परिसेविका ज्योती भारसकर निलंबित तर बालरोगतज्ज्ञ डॉ. सुशील अंबादे, कंत्राटी अधिपरिसेविका स्मिता आंबिलडुके आणि शुभांगी साठवणे यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...