आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विभाग:ऑक्टोबरमध्ये होणार आरोग्य विभागातील भरतीसाठी परीक्षा, आज मुंबईत आयटी कंपनीसोबत बैठक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य विभागाच्या ६ हजार २०५ पदांच्या पुढे ढकलण्यात आलेल्या लेखी परीक्षा १५-१६ किंवा २२-२३ ऑक्टोबर रोजी घेतल्या जातील. त्यासंदर्भात सोमवारी आयटी कंपनीसोबत होणाऱ्या आरोग्य विभागाच्या बैठकीत तारीख निश्चित करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी प्रसारमाध्यमांना दिली.

परीक्षा केवळ पुढे ढकलल्या आहेत. आयटी कंपनीच्या गोंधळाने काही विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागणार होते. न्यासा कंपनीची असमर्थता हे त्यामागचे कारण होते. यासंदर्भात सोमवारी आरोग्य विभाग व न्यासाचे प्रमुख यांची बैठक होणार आहे. त्यात पुढील तारखा ठरवल्या जाणार आहेत. पाच-दहा दिवस जास्त लागले तरी चालेल, परंतु सर्व दक्षता घेऊन तारखांचा निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी सांगितले.सामान्य प्रशासन विभागांतर्गत असलेल्या आयटी विभागाने परीक्षा घेण्यासाठी फडणवीस सरकारच्या काळात कंपन्यांची निवड केलेली आहे. न्यासा कंपनी आरोग्य विभागाने निवडलेली नाही. या परीक्षेसंदर्भात आरोग्य विभागाची प्रश्नपत्रिका तयार करणे इतकीच जबाबदारी होती, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...