आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये शिथील होणार निर्बंध; 'या' जिल्ह्यांना मात्र दिलासा नाहीच! सविस्तर आदेश लवकरच, आरोग्य मंत्र्यांची माहिती

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या जिल्ह्यांत निर्बंध कायम असणार

कोरोना महामारीच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे राज्यात निर्बंध लावण्यात आले आहे. परंतु, कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू कमी होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यात लॉकडाऊन निर्बंधांमध्ये सूट देण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णवाढीचे दर आणि मृत्यूदर कमी आहे, अशा जिल्ह्यांनाच लॉकडाऊन निर्बंधामध्ये सूट दिली जाणार असल्याचे ते म्हणाले. या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सही बाकी असून येत्या एक ते दोन दिवसांत यावर जीआर निघेल असे ते यावेळी म्हणाले.

या जिल्ह्यांना मिळणार सूट
ज्या जिल्ह्यांत कोरोना रुग्णवाढीचा दर आणि मृत्यूदर कमी आहे अशा जिल्ह्यांनाच यामध्ये सूट मिळणार आहे. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील 25 जिल्ह्यांत लॉकडाऊन निर्बंधांमध्ये सूट देण्यात येणार आहे. मात्र, काही भागात सध्याही कोरोनाचे नवीन प्रकरणे वाढत आहे. तर दुसरीकडे, कोरोनाची तिसरी लाट येत्या काही दिवसांत येईल अशी चिंता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

या जिल्ह्यांत निर्बंध कायम असणार
राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव कायम असल्याने तेथे हा निर्बंध असाच ठेवला आहे. यामध्ये पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...