आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजेश टोपेंचे विद्यार्थ्यांना पत्र:मुलांनो, बाहेर जाताना आई-बाबांनी मास्क घातला की नाही ते पाहा, कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्यमंत्र्यांची विद्यार्थ्यांना मदतीची हाक

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लक्षण दिसले तर लगेच दवाखान्यात घेऊन जा

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढतोय. वारंवार अावाहन करूनही लोक गर्दी करतात, मास्क लावत नाहीत हे दिसून येत आहे. थोरली मंडळीच ऐकत नाही म्हटल्यावर कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आता थेट शाळकरी मुलांनाच मदतीची हाक दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना पत्र लिहिले अाहे. पत्रात टोपे म्हणतात, कोरोनाविरुद्धची लढाई गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. तुमचं खेळण्याचं, क्रीडांगणावर घाम गाळण्याचं हे वय आहे. परंतु गेले वर्षभर तुम्हाला घरातच बसावं लागलं. कोरोनावर मात करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. प्रथम तुम्ही तुमची काळजी घ्या. तसेच आई-वडील, भाऊ-बहीण, शेजाऱ्यांचीही काळजी घ्या. आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेर जाताना मास्क लावला का, बाहेरून आल्यावर त्यांनी हातपाय स्वच्छ धुतलेत का, सॅनिटायझर वापरलं की नाही तेदेखील पाहा, असा सल्ला टोपे यांनी दिला अाहे.

लक्षण दिसले तर लगेच दवाखान्यात घेऊन जा
वडीलधाऱ्या मंडळींमध्ये कदाचित कोरोनाची काही लक्षणे दिसलीच तर त्यांना लगेच सरकारी दवाखान्यात घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, असा विश्वासही टोपे यांनी आपल्या पत्रातून दिला आहे. आजचा विद्यार्थी, तरुण हा देशाचा उद्याचा आधारस्तंभ असून सुदृढ शरीर, सकारात्मक मन, बुद्धी सतेज पाहिजे तरच त्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतात. तेव्हाच तो जीवनात यशस्वी होतो, असा प्रेरणादायी सल्लाही टोपेंनी मुलांना दिला आहे.

आरोग्यमंत्री कोरोनाग्रस्त
कोरोना संसर्ग झाल्यामुळे आरोग्यमंत्री टोपे सध्या उपचार घेत आहेत. गेले वर्षभर त्यांनी राज्यभर सातत्याने दौरे करून कोरोना लढाईत आरोग्य कर्मचारी, सेवकांच्या सोबत काम केले. गतवर्षी त्यांच्या आईची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल केले होते. त्या तणावाच्या प्रसंगीही टोपेंनी आपले काम सुरू ठेवले होते हे येथे उल्लेखनीय.

बातम्या आणखी आहेत...