आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्र्यांना कोरोना:आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण, गेल्या दोन दिवसांमध्ये तीन नेत्यांना कोरोनाचा विळखा

मुंबई15 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोशल मीडियावर यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यातील कोरोनाचा धोका दिवसेंदिवस पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. सरकार यामुळेच निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात कोरोनाची शिरकाव झाला तेव्हापासून आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सातत्याने काम करत आहेत. दरम्यान आता ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोशल मीडियावर यांनी ही माहिती दिली आहे.

'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली करोना चाचणी करून घ्यावी' असे ट्वीट राजेश टोपे यांनी केले आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांत तीन बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली. आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची यामध्ये नावे आहेत.

आतापर्यंत या नेत्यांना झाली आहे कोरोनाची लागण

 • राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे
 • आरोग्यमंत्री राजेश टोपे
 • जलसंपदा मंत्री जयंत पाटील
 • उपमुख्यमंत्री अजित पवार
 • विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस
 • सहकारमंत्री बाळा साहेब पाटील
 • सार्वजनिक बांधकाम अशोक चव्हाण
 • वस्त्रोद्योग मंत्री असलम शेख
 • उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत
 • गृहनिर्माण मंत्री जितेंद्र अह्वाड
 • सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
 • पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बंसोड़
 • महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
बातम्या आणखी आहेत...