आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा धोका:राज्यात डेल्टा व्हेरिएंटच्या 21 रुग्णांपैकी एकाचा मृत्यू, पुन्हा कठोर निर्बंध लावण्याची सध्याच गरज नसल्याची टोपेंची माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ही ओसरताना दिसत असताना एक नवीन संकट आता उभे राहिले आहे. आता महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढत असल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस या व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. राज्यात या व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयी माहिती दिली आहे. तसेच राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागणार का? या प्रश्नाचेही उत्तर दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येमध्ये घट होत आहे. दरम्यान अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. दरम्यान बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. यामुळे राज्यात ठाकरे सरकारकडून पुन्हा कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही करोनाचं संकट कायम असल्याने घाईघाईत व्यवहार खुले करू नका व गर्दी होणार नाही याची खबरदार घ्या असा आदेशही दिला होता. दरम्यान राज्यात पुन्हा निर्बंध लावले जाणार का यावर राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

निर्बंध लागणार का?
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका आहे. हा धोका लक्षात घेता पुन्हा निर्बंध लावले जाणार अशा चर्चा राज्यात सुरू आहे. दरम्यान याविषयी आरोग्यमंत्री टोपेंना विचारले असता ते म्हणाले की, 'निर्बंध लावण्याचे कोणतेही कारण नाही. आपण सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करत योग्य वर्तन ठेवण्याची गरज आहे. आपण नियम पाळले तर कोणतीही अडचण येणार नाही. तसेच तिसऱ्या लाटेची खबरदारी म्हणून आरोग्य विभाग तयारी करत आहे. तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे आणि उपाय योजना केल्या जात आहेत.'

कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी तयारी सुरू

याविषयी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, 'राज्यामध्ये डेल्टा प्लसचे आतापर्यंत 21 रुग्ण सापडले आहेत. मोठ्या संख्येने रुग्ण नसले तरी रुग्णांचा शोध घेणे सुरू आहे. सर्व जिल्ह्यांमधून 100 नमुने घेऊन त्याचा अभ्यास केला जात आहे. हा अभ्यास करत असताना लसीकरण केलेल्यांना पुन्हा संसर्ग होत आहे का अशा गोष्टींचाही अभ्यास केला जात आहे' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'डेल्टा प्लसच्या 21 रुग्णांपैकी 80 वर्षाच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर इतर रुग्णांची स्थिती स्थिर आहे. तर काहीजण हे बरे होऊन घरी गेले आहेत.'

बातम्या आणखी आहेत...