आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यमंत्र्यांना मातृशोक:'दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले' आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे आईसाठी भावनिक ट्विट

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचं प्रदीर्घ आजारानं शनिवारी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. वयाच्या 74 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर बाॅम्बे हाॅस्पिटल, मुंबई येथे उपचार सुरू होते. हृदयाशी संबंधित आजारामुळे त्यांची प्रकृती खूप खालावली होती. यानंतर राजेश टोपेंनी आईसाठी भावनिक ट्विट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून आरोग्य मंत्री हे राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. यासोबतच ते आपल्या आईचीही काळजी घेत होते. आता आईच्या निधनानंतर त्यांनी आपल्या भावना ट्विटरद्वारे व्यक्त केल्या आहेत. 'ती अजातशत्रु होती…एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही….सर्वांना प्रेम दिले… माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. ४ वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती….दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील', असं भावनिक ट्विट टोपे यांनी केलं आहे.

त्यांच्या पश्चात आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुलगी डाॅ. वर्षा देसाई, सून, नातवंडे असा परिवार आहे. अत्यंत मितभाषी म्हणून शारदाताईंची ओळख होती. त्यांच्यावर रविवारी सायंकाळी ४ वाजता कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर (ता. अंबड) येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

बातम्या आणखी आहेत...