आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरक्षण:मराठा आरक्षणाची सुनावणी 11 न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्यात यावी : बैठकीत मागणी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारची इच्छाशक्ती नाही, श्वेतपत्रिका काढावी

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात आठ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही संधी घालवू नये, असे आवाहन करत यासंदर्भात बैठकीत साधकबाधक चर्चा झाल्याची माहिती समितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी दिली. दरम्यान, सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही, अशी टीका करत या प्रश्नावर श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी खा. उदयनराजे भोसलेंनी केली.

मराठा आरक्षण प्रश्नावर ८ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यासंदर्भात रविवारी उपसमितीची बैठक झाली. त्याचा तपशील चव्हाण यांनी सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषदेत सांगितला. बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खा. संभाजीराजे, उदयनराजे भोसले उपस्थित होते. केंद्राच्या भूमिकेसंदर्भात माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती करण्यात आल्याचेही चव्हाण म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...