आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात उन्हाचा चटका असह्य होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक भागांत पारा चाळीशी पार गेला आहे. त्यामुळे पीके वाळत असल्याने शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसत आहे. मात्र, आता उन्हापासून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. येत्या 13 एप्रिलनंतर उष्णतेची लाट ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा ते कर्नाटकपर्यंत सध्या हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान असल्याने ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भात उष्ण लाटेचा इशारा
राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा चटका कायम आह. तर दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. चंदगड येथे ६० मिलिमीटर, सातारा आणि उस्मानाबाद येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान आहे. आज या भागांत ढगाळ हवामान राहिल व विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, आज पश्चिम विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
14 जिल्ह्यांत तापमान चाळीशीपार
राज्यात तापमानाचा पारा थोडा कमी होत असला तरी कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. शनिवारी 14 जिल्ह्यांतील तापमान चाळिशीपार होते. अकोला आणि जळगाव येथे शनिवारी (ता. ९) उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नगर, अमरावती, चंद्रपूर येथे आहे. ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान ३२ ते ४१ अंशांच्या आसपास आहे. बुलडाणा येथे तापमान ४० अंशांच्या पुढे आहे.
प्रमुख शहरांतील तापमान
अकोला -४३.६, अमरावती -४३.०, वाशिम -४३.०, मालेगाव -४२.६, जळगाव -४२.५, वर्धा -४२.२, चंद्रपूर -४२.०, औरंगाबाद -४१.०, बुलडाणा -४१.०, नांदेड -४१.०, यवतमाळ -४०.५,परभणी -४०.५, नागपूर -४०.४, गोंदिया -४०.२,सोलापूर -४०.२, गडचिरोली -३९.२, नाशिक -३७.८
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.