आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठाण्यात हॉस्पिटलमध्ये भीषण आग:मुंब्रा येथील प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटलला आग, 4 रुग्णांचा मृत्यू

ठाणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंब्रा शहरातील कौसा भागात असलेल्या प्राईम क्रिटीकेअर सेंटर या हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी भीषण आग लागली. या घटनेत 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून इतर रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आग लागल्यानंतर आयसीयूतील 6 रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत असताना 4 रुग्णांचा मृत्यू झाला. यास्मिन शेख ( 46 वर्षे), नवाब शेख (47 वर्षे), हलिमा सलमानी (70 वर्षे), हरीश सोनावणे (57 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

हॉस्पटिलमधील आयसीयू वार्डमध्ये 6 तर इतर वार्डात 14 रुग्ण होते. आगीची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस, ऍम्ब्युलन्स, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आयसीयूमधील रुग्णांना लगेच बिलाल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले तर इतर रुग्णांना सुटी देण्यात आली.

स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्राथमिक तपासानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती समोर येत आहे. सध्या ठाणे महानगरपालिकेने चौकशीचे आदेश दिले आहेत. या आगीच्या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली असून जखमींना देखील 1 लाख देण्यात येणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...