आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार:हवामान विभागाचा इशारा; कोकणासह मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात अनेक ठिकाणी पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील काही तासांतच कोकणासह मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल, भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे.

वैनगंगा नदीला पूर:भंडारा जिल्ह्यात शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला

कोकणात आज मुसळधार

के. एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे की, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकणासह पुणे, सातारा तसेच घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता आहे. याठिकाणी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा

  • मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, रायगड, पालघर, रत्नागिरी, पालघर, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, कोल्हापूर

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

  • औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, संपूर्ण कोकण भाग व घाटमाथ्याचा परिसर

शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार

जुलैच्या अखेरच्या आठवड्यात तसेच ऑगस्टच्या सुरुवातीला राज्यात दमदार पाऊस पडला. अनेक भागांत अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. त्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने अतिवृष्टी झालेल्या भागांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. विशेषत: पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील शेतीला पावसाच्या या विश्रांतीचा फायदा झाला. मात्र, आता पुन्हा या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. दुसरीकडे, मराठवाड्यात मात्र, गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे आता पुन्हा सुरु झालेल्या पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...