आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुण्यात पावसाचा हाहाःकार:मुंबईच्या अनेक भागात साचले पाणी, ठाण्यासह संपूर्ण उत्तर कोकणसाठी 24 तासाचा रेड अर्लट; पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिराला नदीचे स्वरूप

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्याच्या पूरग्रस्त भागातून 40 जणांना वाचवले

हैदराबादनंतर आता महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यातील अनेक भागात बुधवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्याच्या अनेक भागात पाणी साचले आहे. येथील घरे, रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणेसह उत्तर कोकणातील अनेक भागात गुरुवारी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे तेलंगणात मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे 30 जणांचा मृत्यू झाला आहे.

बारामतीत मुसळधार पावसामुळे घरांत पाणी शिरले.
बारामतीत मुसळधार पावसामुळे घरांत पाणी शिरले.

मुंबईच्या लोअर परेळ भागातही पाणी साचले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात पाणी साचल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अपडेट्स

एनडीआरएफने कर्नाटक आणि महाराष्ट्रात 2 रेस्क्यू पथके पाठवली आहेत. महाराष्ट्रात पाठवलेले पथक सोलापूर, पुण्यातील इंदापूर आणि लातूरमध्ये तैनात केली आहेत.

कर्नाट नीरावरी निगम लिमिटेडनुसार, राज्यातील मुसळधार पावसामुळे सोन्ना बैराज धरणातून 2 लाख 23 हजार क्युसेकने अफजलपूर, कलबुरगी जिल्ह्यात भीमा नदीत पाणी सोडण्यात आले.

हवामान विभागानुसार, मध्य महाराष्ट्रात पुढील 12 तासांत 20 ते 30 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गुरुवारी होणाऱ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षा रद्द केल्या आहेत. नवीन वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल.

पुण्याच्या पूरग्रस्त भागातून 40 जणांना वाचवले

बुधवारी पुण्यातील निंबगाव केतकी या पूरग्रस्त गावातून 40 जणांची सुटका करण्यात आली. बारामतीच्या एसडीओनुसार, 40 जणांना वाचवण्यात आले तर आणखी 15 जणांना वाचवण्यासाठी बचाव मोहीम सुरू आहे. दुसरीकडे इंदापूरमध्ये एक व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होता. मात्र स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला वाचवण्यात यश आले. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या सायन पोलिस स्टेशन आणि किंग्ज सर्कलमधील रस्तेही पाण्याखाली गेले आहेत.

मुसळधार पावसामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळील रस्तेदेखील पाण्याखाली गेले होते. यामुळे मंदिराला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पावसामुळे पुण्यातील अनेक भागात रात्रीपासून वीजपुरवठा बंद आहे.

बातम्या आणखी आहेत...