आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र रेड अलर्ट:मुंबईमध्ये 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा, समुद्रात उसळू शकतात 5 मीटर उंच लाटा, समुद्र किनारी न जाण्याचे बीएमसीचे आवाहन 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीच्या अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे, रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे
  • मुंबईमध्ये शक्रवारी अनेक परिसरात रस्त्यांवर पाणी भरल्यामुळे वाहतुक विस्कळीत झाली

हवामान विभागाने मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात पुढच्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शनिवारी या परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला. यापूर्वी शुक्रवारी जवळपास संपूर्ण दिवस मुंबईसह उपनगर ठाणे, पालघरच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी आणि रायगडच्या काही भागांमध्येही पाणी तुंबले होते

सकाळपासून मुंबईच्या या भागांमध्ये पडतोय पाऊस 
शनिवारी सकाळपासून मुंबईच्या सबअर्बन परिसरात 5 ते 10 मिमी एवढा पाऊस झाला. यामध्ये विले पार्ले, अंधेरी, माटुंगा, किंग सर्कल, एंटॉप हिल, बांद्रा आणि मडालच्या काही भागांचा समावेश आहे. यापूर्वी शुक्रवारी पावसामुळे मुंबई शहर आणइ उपनगरांमध्ये जागोजागी पाणी साचले होते. यामध्ये दादर, माटुंगा, वरळी नाका, लालबाग, किंग्स सर्कल, सायन, कुर्ला, अंधेरीसह अनेक भागांचा समावेश होता.

आज महाराष्ट्रात पावसाचा इशारा

हवामान विभागाने म्हटले की, शनिवारी पालघर, मुंबई, ठाणे आणि रायगड आणि रत्नागिरीच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

अनेक ठिकाणी मार्ग बदलावे लागले 
शुक्रवारी हिंद माता आणि गोलदेवल परिसरात रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली. अधेरी सबवेपासून वाहतूक थांबवण्यात आली होती. मुलुंडमध्ये अनेक ठिकाणी पाणी भरल्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी झाडं कोसळली आणि शॉर्ट सर्किट होण्याच्या घटना घडल्या. लॉकडाउनमुळे रस्त्यांवर जास्त लोक नव्हते. तरीही पावसामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाले होते. 

0