आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पाऊस:मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात, विविध ठिकाणी सखल भागात साचलं पाणी, येत्या तीन तासात जोरदार पावसाचा इशारा 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई शहरासह अनेक भागांमध्ये सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहे. दादर,  वरळी, माटुंगा, सायन, कुर्ला, लालबाग, अंधेरीसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. यामध्ये हिंदमाता, अंधेरी, कुर्ला, सायन यासह अनेक ठिकाणच्या सखल भागांचा समावेश आहे. दरम्यान सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वाहतुक संथ गतीने सुरू आहे. 

येत्या तीन तासात जोरदार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

दरम्यान या जोरदार पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईमध्ये येत्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि सोलापुरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाआहे. तर मुंबई वेधशाळेनं जिल्हा प्रशासनाला माहिती दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचे आदेशही देण्यात आले आहेत. 

तर मुंबईमध्ये शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 

Advertisement
0