आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून:मुंबई आणि कोकणला पावसाने झोपडले, गुरुवारी सुद्धा मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातही सरीवर सरी...

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात कुठे किती पाऊस झाला जाणून घ्या

मुंबईसह राज्यातील अनेक भागांत बुधवारी दिवसभर मुसळधार पावसाने झोडपले. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरुवारी देखील मुसळधार पाऊस पडले असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

बुधवारी सकाळी 8.30 ते गुरुवारी सकाळी 6.30 दरम्यान मुंबईतील वांद्रेत 201 मिमी आणि महालक्ष्मी भागात 129 पाऊस झाला. दरम्यान गुरुवारी देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी सांगितले. 

रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीवर मागील 24 तासांत 127.2 मिमी पाऊस झाला.  मराठवाड्यातील नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यात अनुक्रमे 96.4 मिमी आणि 25.8 मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीत 58.8 मिमी, तर जळगाव जिल्ह्यात 53 मिमी पाऊस झाला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे 41.6 मिमी आणि माथेरान येथे 48 मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात 35 मिमी पाऊस पडला आहे, तर पालघर जिल्ह्यातील 21.1 मिमी पावसाची नोंद झाली. 

बातम्या आणखी आहेत...