आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जोरदार पावसाचा परिणाम:येत्या 24 तासात मुंबई आणि उपनगरांच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता, कार्यालयांना सुटी देण्याचे बीएमसीचे आवाहन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहे.

मुंबईत कालपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. संध्याकाळपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते. या पावसाचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर झाला आहे. रेल्वे सेवाही यामुळे ठप्प झाली होती. आजही मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्व कार्यालयांना सुटी देण्याचे आवाहन केले आहे.

आज बुधवारी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कार्यालयांना सुट्टी देण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. तर पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहे. मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहयला मिळत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ट्विटरच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे की, 'भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टी च्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे तसेच, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.'