आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत तुफान पाऊस:मुंबईतील बेसुमार पावसाला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, मुख्यमंत्र्यांनी 10 हजारांची मदत तातडीने जाहीर करावी, भाजपची मागणी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईमध्ये तुफान पाऊस होत आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. यासोबतच समुद्रातील पाणीही काही भागांमध्ये शिरले आहे. अनेक घर आणि दुकानांमध्ये पाणी शिरुन नुकसान झाले आहे. यामुळे आता अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 10 हजारांची मदत जाहीर करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही मागणी करत पत्र लिहिले आहे. अतुल भातखळकर यांनी लिहिले की, 'गेले दोन दिवस मुंबईत पडलेल्या बेसुमार पावसामुळे झोपडपट्ट्यांमध्ये घरात पाणी शिरून अन्नधान्य, पलंग, टीव्ही आदी घरगुती सामानाचे अतोनात नुकसान झाले. अवघ्या 12 तासात 294 मिमी एवढा पाऊस झाला, याचा अर्थ ही नैसर्गिक आपत्ती आहे. मुख्यमंत्र्यानी घरटी रु.10 हजाराची मदत तातडीने जाहीर करावी.

अतुल भातखळकर यांनी पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की, कालच मुंबई महापालिका आयुक्तांनी या पावसाच्या संदर्भात बोलताना हे एक छोंट वादळ असल्याचं म्हटलं आहे. अवघ्या 12 तासांमध्ये मुंबईमध्ये 294 पाऊस झाला. याचा अर्थ ही नैसर्गी आपत्ती आहे. यामुळे दोन दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करुन मदत करण्याची मागणी त्यांनी केली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हातावर पोट असणारे लोक तसेच चाळींमधील निम्न-मध्य वर्गीय अशा सर्वच लोकांना रोजगारापासून वंचित राहावे लागतेय. अशात हे नैसर्गिक संकट आले. यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी सर्वसामान्यांची स्थिती झाली आहे. यामुळे या नैसर्गिक आपत्तीनंतर सरकारने सर्वेक्षण करुन मदत जाहीर करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...