आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुसळधार:मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात, अनेक परिसरातील सखल भागात पाणी साचले 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

गेल्या 24 तासांपासून राज्याभरात सर्वत्र पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहे. तर राज्यात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस बरत आहे. दरम्यान मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईतील काही ठिकाणी पावसाने पाणी साचले आहे. सकाळीच हवामान विभागाने मुंबईत येत्या तीन तासाच मुसळधार पाऊस पडणार असा इशारा दिला होता. 

मुंबईतील पूर्व उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुलूंड ते सायन या परिसरातही पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. सकाळपासून चेंबूरमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. चेंबूरच्या पोस्टल कॉलनी परिसरात मनपाचे बुस्टर पंप सुरु असूनही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. 

Advertisement
0