आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:अतिवृष्टीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना मिळणार मोठी मदत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डोंगरालगत असलेल्या गावांचे पुनर्वसन

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु होता. यामुळे बऱ्याच जिल्ह्यांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे तर अनेक लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. राज्यांत आतापर्यंत अतिवृष्टीमुळे 145 जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत व्यक्तींच्या वारसांसाठी मोठी घोषणा केली आहे. सातारा येथील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या नुकसानी भरपाईच्या आढावा बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.

अशी मिळणार मदत
अतिवृष्टीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येक 9 लाख रुपये देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख, केंद्र सरकारच्या माध्यमातून 2 लाख आणि शेतकरी असल्यास 'गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजने'तून 2 लाख असे एकूण 9 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

डोंगरालगत असलेल्या गावांचे पुनर्वसन
अजित पवार पुढे म्हणाले की, मुसळधार पावसामुळे डोगरालगत असलेल्या गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे अनेकांना मोठी किंमतही मोजावी लागते. त्यामुळे डोंगराला लागून असलेल्या गावांचे स्थंलातरण आणि पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे. नुकसान भरपाईवर बोलताना म्हणाले की, पुढील एका आठवड्यात नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करुन तात्काळ मदत दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...