आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अनलॉक-3 वर पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद:राज्यात संसर्गजन्य रोगांसाठी रुग्णालय उभारण्यास मदत करा : उद्धव ठाकरे

नवी दिल्ली / मुंबई/ कोलकाता3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीपीई किट व एन-95 मास्कच्या पुरवठ्यात वाढ करण्याचीही मागणी

देशात ३१ जुलैला अनलॉक-२ ची अखेर होत आहे. आता केंद्र सरकार अनलॉक-३ च्या तयारीला लागले आहे. या अनुषंगाने सेामवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पुढील रणनीती आखण्यासाठी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन चर्चा केली. या वेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांबरोबरच उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांच्या व केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांचा सहभाग होता.

चर्चेदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत कोरोनासारख्या आजारांचा नि:पात करण्यासाठी संसर्गजन्य रोगांवर उपचार करणारे स्थायी रुग्णालय व संशोधन केंद्र उभारण्याची आमची तयारी आहे. या कार्यात केंद्र सरकारने आम्हाला मदत करावी. कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने पीपीई किट व एन-९५ मास्कच्या पुरवठ्यात वाढ करण्याचीही मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, राज्यात आपद्ग्रस्त निधीतील रकमेचा वापर अंफन वादळानंतर पुनर्वसन कार्यात करण्यात आला. आमची ५३ हजार कोटी रुपये येणे असलेली थकीत रक्कम त्वरित देण्याची मागणी केली. ही रक्कम न मिळाल्यास आम्ही कोरोनाचा नायनाट कसा करणार?