आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Hemangi Bra And Women: Trupti Desai Extends Support Questions Hemangi Post On Women Dress Code At The Same Time| Who Said What | Hemangi| Tripti Desai| Bra Post

हेमांगीवर का संतापल्या तृप्ती देसाई:आम्ही ड्रेस कोड आणि मासिक पाळीवर बोलत होतो तेव्हा कुठे होत्या? तृप्ती देसाई यांचा हेमांगीला सवाल; ब्रा वरील सोशल मीडिया पोस्टमुळे आहे चर्चेत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांच्या अंतर्वस्त्रांवर लिहिलेल्या सोशल मीडिया पोस्टवरून अभिनेत्री हेमांगी कवी सध्या चर्चेत आहे. तिने ब्रा आणि त्यावर पुरुषांच्या दृष्टीकोनावर लिहिलेल्या या पोस्टवर आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सुद्धा एक सोशल मीडिया पोस्ट करून त्याखाली हेमांगीची पोस्ट शेअर केली. परंतु, तिच्या विचारांचे समर्थन करत असतानाच आधी का आवाज उठवला नाही असा सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला. जेव्हा आम्ही मंदिरात महिलांचा प्रवेश, मासिक पाळी आणि महिलांच्या ड्रेस कोडवर आवाज उठवला तेव्हा तू कुठे होतीस? असा प्रश्न देसाई यांनी विचारला आहे.

उशीरा का होईना धाडस तरी केले -तृप्ती देसाई

तृप्ती देसाई यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिले, "सदर अभिनेत्री आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड च्या विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या मला माहित नाही..." "त्यांच्या या जाहीर लेखाचे स्वागतच आहे , सर्वांनीच आता जाहीरपणे व्यक्त होणे ही काळाची गरज आहे.परंतु मला त्यांना आवर्जून सांगायचे आहे की ज्या महिला या संदर्भात गॉसिप्स करतात किंवा उघडपणे बोलत नाहीत, किंवा विकृत मानसिकतेचे पुरुष असोत त्यांचीच तर मानसिक बदलण्यासाठी आमचाही प्रयत्न आहे आणि तो करताना ट्रोलिंग, शिवीगाळ, हल्ले याला आम्हालाही सामोरे जावे लागले. परंतु त्यावेळी मात्र ना प्रवीण तरडे यांनी जाहीर पाठिंबा दिला, ना हेमांगी यांनी...." "जेव्हा महिलांना मासिक पाळी या विषयावरून दुजाभाव केला जातो ,अनेक ठिकाणी बंदी घातली जाते याविषयीही आम्ही कृतीत आंदोलने केली परंतु अशा वेळेला असे लोक का साथ देत नाहीत हे समजले नाही." "इंदुरीकर तर जाहीरपणे महीलांच्या वेशभूषा वर आणि महिलांबाबत बदनामीकारक वक्तव्य अनेक कीर्तनातून करत असत त्यावेळेला हे सर्व कुठे होते असाच प्रश्न पडतो?" असो उशिरा का होईना परंतु धाडस करून लिहायला तरी सुरुवात केली "हे ही नसे थोडके".

काय म्हणाली होती हेमांगी?
हेमांगीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये महिलांवर अप्रत्यक्षरित्या ब्रा घालण्याची सक्ती केली जाते. पुरुषांना अशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत नाही. कारण, पुरुषांच्या अंगाचा भाग दिसणे आणि त्यावर दुर्लक्ष करणे हा लोकांच्या सवयीचा भाग बनला आहे. महिलांविषयी सुद्धा पुरुषांचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. घरात असताना आपण ब्रा वापरत नाही आणि त्यावर कुणी कधी आक्षेप सुद्धा घेतला नाही. महिलांना ब्रा वापरणे किंवा नाही वापरणे याचे स्वातंत्र्य असायला हवे असे विचार हेमांगीने व्यक्त केले. तेव्हापासून तिला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाले. तर काहींनी तिला ट्रोल करण्याचा देखील प्रयत्न केला.

हेमांगी आणि तृप्ती देसाई यांच्या फेसबूक पोस्ट जशास तसे...

बातम्या आणखी आहेत...