आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनसीबीच्या कारवाईत माजी वैमानिकही अटकेत:कोचीत 1200 कोटींचे हेरॉइन; मुंबई, गुजरातेतून मेफेड्रॉन जप्त

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळच्या कोचीत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) नौदलाच्या संयुक्त मोहिमेत १२०० कोटी रुपयांहून जास्त मूल्याचे सुमारे २०० कोटी हेरॉइन जप्त केले आहे. या कारवाईत मासे पकडणाऱ्या इराणी नौकेवर स्वार ६ इराणी नागरिकांना अटक केली आहे. एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांनी सांगितले की, हेरॉइनची खेप सुरुवातीस पाकिस्तानच्या बोटीतून आणली आणि नंतर इराणच्या बोटीत ठेवली. काही भाग श्रीलंका आणि काही भारतात दिला जाणार होता.

दुसरीकडे, एनसीबीने मुंबई आणि गुजरातमधून १२० कोटी रुपयांहून जास्तीचे ६० किलो मेफेड्रॉन जप्त केले. याप्रकरणी एअर इंडियाच्या माजी वैमानिकासह आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेलच्या ६ सदस्यांना अटक केली. एनसीबीचे महासंचालक संजय सिंह म्हणाले, ‘गुजरातच्या जामनगरमध्ये नौदलाच्या गुप्तचर शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. आम्ही वेगवेगळ्या राज्यांत पसरलेले ड्रग्जचे नेटवर्क उद्ध्वस्त केले असून सिंडिकेटमध्ये सहभागी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई विभागीय शाखेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी जामनगरमध्ये छापे टाकले आणि १० किलो मेफेड्रोन जप्त केले. एनसीबीच्या पथकाने यासंदर्भात एका व्यक्तीला जामनगर येथून आणि इतर तिघांना मुंबईतून अटक केली.

दुसरीकडे, एनसीबीच्या पथकाने दक्षिण मुंबईच्या फोर्ट भागातील एका गोदामावर छापा टाकला. तेथून ५० किलो मेफेड्रोन जप्त केले. याप्रकरणी म्होरक्यासह अन्य २ आरोपींना अटक केली.त्यापैकी एक हिस्ट्रीशीटर आहे. त्याला महसूल गुप्तचर संचालनालयाने २००१ मध्ये ३५० किलोच्या मॅनड्रॅक्स ड्रग्जच्या तस्करी प्रकरणात अटक केली होती.

बातम्या आणखी आहेत...