आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईमध्ये 125 कोटींची हेरॉईन जप्त:इराणमधून शेंगदाणा तेलाच्या खेपेमध्ये लपवून आणले हेरॉईन, DRI ने बंदरावर छापा टाकून पकडले

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंटेनर ऑर्डर करणाऱ्याचीही फसवणूक झाली

मुंबईत सुरू असलेल्या क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणादरम्यान, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) टीमने मुंबई बंदरावर छापा टाकला आहे. येथील कंटेनरमधून 25 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 125 कोटी असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात आतापर्यंत एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

DRI च्या मुंबई युनिटने बंदरावर छापा टाकल्यानंतर नवी मुंबईतील 62 वर्षीय व्यापारी जयेश सांघवीला अटक केली आहे. सांघवीवर इराणमधून शेंगदाणा तेलाच्या एका खेपेत हेरॉईन लपवून मुंबईत आणल्याचा आरोप आहे. DRI च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्तचर माहितीच्या आधारे, नवी मुंबईतील न्हावा शेवा येथे इराणमधून आणलेला एक कंटेनर जप्त करण्यात आला आणि त्याच्या शोधात हेरॉईन सापडले.

कंटेनर ऑर्डर करणाऱ्याचीही फसवणूक झाली
DRIच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कंटेनर वैभव एंटरप्रायजेसचे संदीप ठक्कर यांनी आयात केले होते, ज्यांचे कार्यालय मस्जिद बंदरमध्ये आहे. DRI च्या टीमने त्याची चौकशीही केली आहे. ठक्करने DRI ला सांगितले की सांघवीने त्याला त्याच्या फर्मच्या IEC वर इराणमधून वस्तू आयात करण्यासाठी 10 हजार रुपये प्रति खेप अशी ऑफर दिली होती. तो 15 वर्षांपासून सांघवीसोबत व्यवसाय करत होता, त्यामुळे त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला.

आरोपी डीआरआयच्या ताब्यात आहे
डीआरआयने सांघवीला अटक केली आणि त्याच्याविरुद्ध नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्सटेंस अॅक्ट (NDPS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला गुरुवारी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 11 ऑक्टोबरपर्यंत DRI कोठडी सुनावली आहे. सांघवीच्या अटकेनंतर, आता DRI टीम आज सकाळपासून मुंबई पोर्टवर उपस्थित असलेल्या इतर काही कंटेनरची तपासणी करत आहे.

मोठा सिंडिकेट असण्याची शक्यता
DRIने न्यायालयात दावा केला की सांघवी हा एका सिंडिकेटचा भाग आहे आणि यामध्ये सामिल सर्व लोकांचे डिटेल्स जाणून घेण्यासाठी सांघवीची चौकशी करणे आवश्यक आहे. DRI ला संशय आहे की यापूर्वीही अशाच प्रकारच्या खेपांची तस्करी झाली असावी. यापूर्वी जुलै महिन्यात DRI ने मुंबई बंदरातून 293 किलो हेरॉईन जप्त केले होते आणि संधू एक्सपोर्ट्स पंजाबचे मालक प्रभाजित सिंह यांना अटक केली होती.

बातम्या आणखी आहेत...