आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाल्गुनी पाठकच्या नवरात्रोत्सवाला हायकोर्टाची परवागनी:सामाजिक कार्यकर्त्यांनी नवरात्रोत्सवाच्या विरोधात केली होती याचिका

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील सर्वात मोठा नवरात्रोत्सव वादाचा भोवरा सुटला आहे. मुंबई हायकोर्टाने गरबा क्वीन फाल्गुनी पाठकचा नवरात्रोत्सवाला ग्रीन सिग्नल दिला आहे. या नवरात्रोत्सवाच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे.

गरबा क्वीन फाल्गुनी पाठकचा यांचा नवरात्रोत्सव प्रमोद महाजन क्रीडा संकुल, कांदिवली (प.) येथे सुमारे 13 एकर जागेत संतोष सिंग यांनी आयोजित केला आहे. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक सानप यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून या कार्यक्रमाला आव्हान दिलं होतं. फाल्गुनी पाठक यांच्या नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले ठिकाण हे क्रीडांगण असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. याशिवाय त्यांनी उपसंचालक क्रीडा आणि युवा सेवा (मुंबई विभाग) यांच्यावरही आरोप केले होते. सार्वजनिक लिलावाची निविदा न काढता नवरात्रोत्सव आयोजित करण्यासाठी क्रीडांगण देण्यात आल्याचा आरोप सानप यांनी केला.

न्यायालयाने जनहित याचिका फेटाळून लावली आणि म्हटले आहे की, नवरात्रीच्या काळात असेच कार्यक्रम आयोजित केले जातात याची आम्ही न्यायालयीन दखल घेतो. याचिकाकर्त्याने केवळ सध्याच्या कार्यक्रमाला लक्ष्य केले आहे असे दिसते. आमच्या विचारात घेतलेल्या मतानुसार, जनहित याचिका मध्ये बोनाफाईडचा अभाव आहे. म्हणून ती विचारात घेण्यास पात्र नाही.

भाजप नेत्यांमध्ये जोरात सुरू आहे स्पर्धा

भाजपच्या एका आमदाराच्या सांगण्यावरून फाल्गुनी पाठक यांच्या कार्यक्रमाला लक्ष्य करण्यात आल्याची मुंबईच्या नवरात्रोत्सवाच्या आयोजकांमध्ये जोरदार चर्चा आहे. कारण या कार्यक्रमाला भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांचा पाठिंबा आहे. तर बोरिवली परिसरातच भाजपचे आमदार सुनील राणे आणि प्रवीण दरेकर यांनीही नवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. याच कारणावरून भाजपच्या नेत्यांमधील आपसातील स्पर्धा जोरात सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...