आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जेेष्ठ कलाकार करु शकणार शूटिंग:65 वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, न्यायालयाची ठाकरे सरकारला चपराक, दोन्ही पत्रके बेकायदा ठरवून रद्द

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

65 वर्षांवरील कलाकारांना चित्रिकरणात भाग घेण्यावर राज्य सरकारकडून निर्बंध लादण्यात आले होते. आता मुंबई उच्च न्यायालयाने ते निर्बंध उठवत ठाकरे सरकारला चपराक दिली आहे.कोर्टाने ज्येष्ठ कलाकारांना निर्बंध घालणारी सरकारची दोन्ही पत्रके बेकायदा ठरवून रद्द केली आहेत. यानंतर आता ज्येष्ठ कलाकारांना चित्रिकरणात भाग घेता येणार आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात 65 वर्षांवरील चित्रपट, टीव्ही कलाकार आणि क्रू मेंबर्सना स्टुडिओ किंवा आऊटडोअर सेटवर काम करण्यास राज्य सरकारकडून बंदी घालण्यात आली होती. चित्रपट व टीव्ही कलाकार प्रमोद पांडे (70) आणि इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर असोसिएशनच्या वतीने वकील अशोक सरोगी यांनी याविरोधात याचिका दाखल केली होती. या दाखल केलेल्या दोन याचिकांवर खंडपीठाने निर्णय दिला. यानंतर सरकारने जारी केलेले दोन ठराव आता मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले.