आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी भडकवल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता हिंदुस्तानी भाऊला मुंबई सत्र न्यायालयातून जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, हिंदुस्तानी भाऊची 30 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहे.
नेमके काय होते प्रकरण?
राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेऐवजी ऑनलाईन परीक्षा घ्याव्या या मागणीचे विनंती पत्र शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांनी देण्यासाठी हिंदुस्थानी भाऊ जात होता. याचा त्याने एक व्हिडीओ मेसेजही आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला.
विद्यार्थ्यांना हजर राहण्याचे आवाहनही त्याने केले होते. आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईच्या धारावी परिसरात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी एकत्र जमा झाले. विद्यार्थ्यांनी दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईनच व्हाव्या या मागणीसाठी आंदोलन केले. तर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र जमा झाले. या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे मुंबई पोलिसांनी कारवाई करत हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास फाठकला अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.