आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल:म्हणाले- भोंगेबाज राजकारण्यांनी हिंदुत्वाचा गळा घोटला; शिर्डी, त्र्यंबकेश्वरमध्येही काकड आरती झाली नाही

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. मनसेच्या खांद्यावर बंदुक ठेवत भाजपने हिंदुत्वाचा गळा घोटला आहे. असा आरोपही राऊतांनी केला. हिंदुंसाठी आजचा काळा दिवस आहे. आज शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये काकड आरती झाली नाही. यामुळे अनेक भक्तांचा हिरमोड झाला असेही राऊत म्हणाले.

राज ठाकरेंचा राजकारणासाठी वापर - राऊत

आज राज ठाकरेंचा वापर भाजपने राजकारणासाठी करून घेतला आहे, आणि हिंदुत्वाचा गळा घोटला आहे. भोंग्याचा वाद हा धर्मिक आहे. नवहिंदुत्ववाद्यामुळे हिंदु धर्मातील सप्ताह आणि धर्मिक कार्यक्रम रद्द करावे लागलेत असा आरोप संजय राऊतांनी लगावला आहे. मंदिरातील काकड आरती वर्षांन वर्षे भोंग्याद्वारे पंचक्रोशीत ऐकली जाते.

भाजपचा हिंदू - हिंदूत वाद पेटवण्याचा प्रयत्न

राज ठाकरेंच्या माध्यमातून भाजप हिंदू-हिंदूत भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मनसेचे या आधीपासूनच मराठी मराठीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता हिंदु धर्मात वाद पेटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मशिदीचे निम्मत करत मंदिरांना टार्गेट केले - राऊत

भारतीय जनता पक्षाने मनसेला पुढे आणत या प्रकरणी राज्यात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मंदिरावर आज भोंगे न लागल्याने लाखो हिंदू बांधवाची गैरसोय झाली. मशिदीवरील भोंग्याचे निमित्त करून मंदिरावरील भोंगे उतरवण्याचे काम भाजप आणि त्यांचे उपवस्त्र असलेल्या मनसेने केले आहे.

हजारो मशिदीत आज अजान झालीच नाही, असे राज ठाकरे म्हणाले असेही खासदार संजय राऊतांनी म्हटले आहे. नियम सगळ्यांसाठी आहे, आणि याचा सर्वाधिक फटका कुणाला बसला असेल तर तो हिंदू धर्मिंयांना असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी देखील पत्रकारांशी संवाद साधला होता. सकाळी बोलताना त्यांनी मनसेने समान नागरी कायद्याबद्दल बोलणे टाळावे, असे म्हटले होते.

हिंदुत्ववादाची मशाल वीर सावरकर आणि बाळासाहेबांनी पेटवली
राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचा व्हिडिओ ट्विट केल्यावरून संजय राऊत यांनी राज याच्यांवर जोरदार टीका केली. ज्यांनी बाळासाहेबांना सोडले, त्यांच्याकडून काय हिंदुत्व शिकायचे, असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच, या देशात हिंदुत्ववादाची मशाल बाळासाहेब ठाकरे व वीर सावरकर यांनीच पेटवली आहे. मात्र, काही जण आता बेगडी हिंदुत्ववाद्यांच्या खिशात गेले आहेत. अशांची दखल शिवसेना घेत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

सर्व भोंगे बंद करा, असे बाळासाहेब म्हणाले नाही!
राज ठाकरे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे सर्व प्रार्थना स्थळांवरील भोंगे बंद करा, असे म्हणालेच नव्हते. हिंदु धर्मीयांच्या अनेक सणांमध्ये भोंग्यांचा वापर केला जातो. तेदेखील भोंगे बंद करावे, अशी मनसेची भूमिका आहे का, असा सवालही संजय राऊत यांनी केला. तसेच, केवळ मशिदींवरील भोंगे बंद करावेत, अशी मनसेची भूमिका असेल तर मनसेने समान नागरी कायद्याची भाषा करू नये, असे राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...