आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी देशसेवेचे व्रत अंगीकारावे:सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांचे प्रतिपादन

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी आयुष्यभर शिस्तीचे पालन करून देशसेवेचे व्रत अंगीकारावे असे आवाहन सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी बुधवारी केले. येथील आदर्श महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांचा 'सी' प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर काबरा, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सीलचे पदाधिकारी ॲड. सतीष देशमुख, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी अनंता जोशी, हिंगोली वकील संघाचे अध्यक्ष ॲड. किरण नरसीकर, माजी अध्यक्ष ॲड. मतीन पठाण, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, प्रभारी प्राचार्य डॉ.विलास आघाव व एनसीसी विभाग प्रमुख मेजर पंढरीनाथ घुगे उपस्थित होते.

यांचा सत्कार

यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या सी प्रमाणपत्र परिक्षेत यश मिळविलेल्या विशाल गाडेकर, गोपाल पोले, आदित्य तोडकरी, आडे रामेश्वर आडे, मारोती बेंगाळ, विवेक भालेराव, पवन भरकडे, विशाल देशमुख, भगवान दंडे, सुमीत काळबांडे, रतन काळे, स्वप्नील कांबळे, अंकुश लांबाडे, जानकीराम मुरकुटे, संघर्ष नरवाडे, सय्यद नदीम, अनिकेत विटेकर यांचा सत्कार करण्यात आला.

एनसीसी विद्यार्थ्यांचे परिश्रम

यावेळी बोलतांना देशमुख म्हणाले की, राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना शालेय जिवनापासूनच शिस्त व देशभक्तीचे धडे दिले जातात. त्यामुळे छात्र सेनेचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. या विद्यार्थ्यांनी देशसेवा करण्यासाठी सैन्यात भरती होऊन देशसेवेचे व्रत अंगीकारले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी मेजर पंढरीनाथ घुगे अमर पवार, वामन शंतनु , शिक्षकेतर कर्मचारी धम्मा इंगोले व अन्य एनसीसी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...