आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:पोलिस स्टेशनमध्ये साजरा झाला हिस्ट्रीशीटरचा वाढदिवस, पोलिसांनी खाऊ घातला केक; पोलिस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईला लागून असलेल्या वसईतील तुळींज पोलिस स्टेशनमध्ये एका हिस्ट्रीशीटर आणि भूमाफियाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले

सचिन गालावर दाखल आहेत गंभीर गुन्हे

स्वतःला बिल्डर म्हणून म्हणवणाऱ्या सचिन गाला याच्यावर फसवणूकीची अनेक प्रकरणे आहेत. याशिवाय त्याला वसई आणि विरार शहराच्या महानगर पालिकेद्वारे अवैध निर्माणाबाबत एमआरटीपीची नोटिस जारी करण्यात आली आहे. सचिन गालावर आरोप आहे की, त्याने जनावरां चारा छावनीसाठी महाराष्ट्र सरकारने ताब्यात घेतलेल्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करुन अवैध बांधकाम सुरू केले.

टाळ्या वाजवून पोलिस कर्मचाऱ्यांनी केक खाऊ घातला

12 ऑक्टोबरला वाढदिवस साजरा केलेल्या व्हिडिओमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एस. पाटील यांच्यासह संपूर्ण पोलिस विभाग त्यांच्या केबिनमध्ये हजर आहे. आधी गालासाठी सर्वजण टाळ्या वाजवून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि नंतर सगळे त्याला आपल्या हातांनी केक खाऊ घालतात. दरम्यान, संजय गालाने त्याच्यावर लावलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे.