आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय:ऑक्टोबरमधील अतिपावसाचा फटका; शेतकऱ्यांना 750 कोटी रुपयांची मदत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत घेण्यात आला. यानुसार ३ हेक्टर मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी आत्तापर्यंत ४७०० कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिली आहे.

ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २५ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आजतागायत कधीही नुकसान भरपाई दिली जात नव्हती. यंदा प्रथमच अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यासाठी सुमारे ७५० कोटी रुपये इतके वाटप करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेला सततचा पाऊस आणि नुकसानीसाठी हेच निर्णय लागू करण्यात येणार आहेत.

प्रचलित दरांपेक्षा दुप्पट दराने आर्थिक मदत देण्याची घोषणा आतापर्यंत ४० लाख शेतकऱ्यांना ४७०० कोटी रुपयांची मदत मदत व पुनर्वसन विभागाने माहिती दिल्याप्रमाणे जून-जुलैपासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या ४० लाख १५ हजार ८४७ शेतकऱ्यांना सुमारे ४७०० कोटींची मदत करण्यात आली आहे.

एनडीआरएफच्या निकषांपेक्षा जास्त : ही मदत एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुपटीने जास्त व दोनऐवजी ३ हेक्टर अशी वाढीव आहे. शेती प्रचलित दर वाढीव दर जिरायत पिके रु.६८०० प्रति हेक्टर रु.१३,६०० प्रति हेक्टर बागायती पिके रु. १३,५०० प्रति हेक्टर रु.२७,००० प्रति हेक्टर बहुवार्षिक पिके रु. १८,००० प्रति हेक्टर रु. ३६,००० प्रति हेक्टर टीप : प्रचलित दर दोन हेक्टर मर्यादेत असून वाढीव दर ३ हेक्टरच्या मर्यादेत आहेत.

पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर संपवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून त्यांना मदत करता येईल. आपण महसूल व कृषी विभागाला निर्देश दिले होते, त्याप्रमाणे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू असून यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दोनएेवजी तीन हेक्टरपर्यंत मर्यादा ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. लवकर याबाबत विहित नमुन्यात शासनास निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त होतील. मंत्रिमंडळाने शेतीपिकांच्या नुकसानीची दखल घेतली. ऑक्टोबरमधील या शेतीपिकांच्या नुकसानीकरिताही राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दुप्पट दराने ३ हेक्टर मर्यादेपर्यंत मदत करण्यात येत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे ६० कोटी रुपयांची नुकसान भरपाई सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या नुकसान भरपाईपोटी मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५९ कोटी ८७ लाख रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यास राज्य सरकारने बुधवारी मंजुरी दिली आहे. महसूल आणि वन विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई आणि पीक विम्याची रक्कम मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव गट) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी पाच दिवस उपोषण केले होते.

बातम्या आणखी आहेत...