आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमोल मिटकरींची घणाघाती टीका:फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जे चालवलय ते बरे नाही शिंदे साहेब. फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, शिंदे सरकारला 35 दिवस पुर्ण. राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा कॅबिनेट विना एकहाती सरकार. या खेळात मात्र सामान्य जनता होरपळत चालली आहे. जे चालवलय ते बरे नाही शिंदे साहेब. फडणीसांच्या नादाला लागुन आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात.

याशिवाय त्यांनी आणखी एक ट्विट करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली. ट्विटमध्ये म्हटले की, संघराज्यामध्ये राज्यपालांचा सहभाग महत्त्वाचा व राज्यपालांची भूमिका महत्त्वाची, असे घटना तज्ञांचे मत असले तरी महाराष्ट्राच्या राज्यपालांना संघराज्य म्हणजे "रेशीमबाग" असेच वाटत असावे. म्हणून ते संघाला पोषक असे वागतात. राज्यपालांनी भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करायला वेळ काढावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यपालांवर टीका
राज्यपालांवर टीका

याशिवाय, माध्यमांशी बोलताना मिटकरी यांनी 'हर घर तिरंगा' या भाजपच्या मोहिमेवर टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत. शिंदे सरकार आल्यापासून राज्यात संपूर्ण महाराष्ट्र विविध समस्यांनी होरपळून निघाला आहे. अजून महाराष्ट्राला कृषीमंत्री नाही. दुसरीकडे ही बोगसबाजी सुरू आहे. तिरंग्याच्या नावावरदेखील धंदेबाजी करता येते हे भाजपने दाखवून दिले. जसे हे वारंवार राज्यघटनेचा अपमान करतात. तसेच हे राष्ट्रध्वजाचा अपमान करत आहेत. आरएसएसला देशाचा ध्वज मान्य नाही आणि ती लोक जर आता 'हर घर तिरंगा' ही मोहीम राबवत देशभक्ती शिकवायला लागले असतील तर हे नथुराम गोडसेच्या हातून महात्मा गांधींची पुजा करण्यासारखे आहे. त्यामुळे भाजपसारख्या देशविघातक पक्षापासून जनतेने सावध रहावे.

बातम्या आणखी आहेत...