आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीर मुद्द्यावरुन शिवसेनेचा सवाल:श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यावर आजही बंदी, मग ते जमिनीचे तुकडे घेऊन काय करायचे? - संजय राऊत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानप्रेमींना कश्मीरातून उखडून फेकले पाहिजे. पण पाकिस्तानचा विषय हा देशातील निवडणुकांत तोंडी लावण्याचा विषय आहे.

काश्मीरमधील घडामोदींवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काश्मीरमध्ये तिरंगा फडकू देणार नसल्याचे वक्तव्य पीडीपीच्या अध्यक्षा मेबबूबा मुफ्तींनी केले. काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणाऱ्या व्यक्तीला अटक झाली. तसेच काश्मीरातील जमीन कोणताही भारतीय खरेदी करु शकतो याची परवानगी आता मिळाली आहे.

यावरुन '370 कलमाचा निचरा करूनही काश्मीरचा प्रश्न संपला नाही. काश्मीरात आता बाहेरच्यांनाही जमीन खरेदी करता येईल असे सरकारी आदेश आले; पण श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यावर आजही बंदी आहे. मग ते जमिनीचे तुकडे घेऊन काय करायचे? असा सवाल शिवसेनेने नेते संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून विचारला आहे.

'रोखठोक'मध्ये नेमके काय?

  • काश्मीरची समस्या कायमचीच संपायला हवी. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न मार्गी लागला. तसा काश्मीरचा प्रश्नही संपावा. काश्मीरच्या भूमीवर जितका रक्तपात झाला तेवढा आतापर्यंत हिंदुस्थानने लढलेल्या चार युद्धांतही झाला नसेल. मोदी हे दुसऱ्या वेळेस पंतप्रधान झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात अमित शहा गृहमंत्री म्हणून बसले. त्यांनी एक काम केले. ते म्हणजे काश्मीरातील 370 कलम उडवून लावले.
  • 370 कलम हटवल्यावर काश्मीरातील परिस्थिती सुरळीत होईल असे काही झाले नाही. उलट तेथील लोकांवर, राजकीय हालचालींवर कडक निर्बंध लादले. आजही काश्मीरात लष्कराच्या बंदुकांमुळेच शांतता आहे.
  • जोपर्यंत पुन्हा 370 कलम काश्मीरात लावले जात नाही तोपर्यंत काश्मीरात तिरंगा फडकवू दिला जाणार नाही, अशी बेताल भाषा करणाऱ्या मेहबुबा मुफ्तीला अटक करून दिल्लीतील तिहार किंवा महाराष्ट्रातील येरवडा तुरुंगात ठेवायला हवे. किंबहुना त्यांची रवानगी अंदमानच्या कारागृहात करायला हवी एवढा त्यांचा अपराध भयंकर आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी तर हिंदुस्थानच्या विरोधात चीनची मदत घ्यायची भाषा केली. हा अतिरेक आहे.
  • काश्मीरमध्ये 370 कलम असल्यामुळे ते एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगत होते. पुन्हा तेथील राजकीय पक्षांचा दोन दगडांवर पाय. त्यातला एक पाय पाकिस्तानात. हिंदुस्थानच्या केंद्रीय सरकारने मनासारखे केले नाही तर पाकिस्तान प्रेमाचे तुणतुणे वाजवून 'ब्लॅकमेल' करायचे हे आतापर्यंत चालले. ते काही प्रमाणात कमी झाले आहे. मात्र 370 कलम हटवल्यावर काश्मीरातील परिस्थिती सुरळीत होईल असे काही झाले नाही. उलट तेथील लोकांवर, राजकीय हालचालींवर कडक निर्बंध लादले. आजही काश्मीरात लष्कराच्या बंदुकांमुळेच शांतता आहे.
  • काश्मीरचा प्रश्न फक्त पंडित नेहरू किंवा काँग्रेसमुळेच चिघळला हा काही प्रमाणात अपप्रचार आहे. पंडित नेहरूंनी कश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी व शांतता राखण्यासाठी त्यांच्या परीने प्रयोग केले. असे 'प्रयोग' अटलबिहारी वाजपेयी यांनीही केले. लाहोरला ते बस घेऊन गेले. मुशर्रफबरोबर आग्रा येथे परिषद घेतली. हा प्रयोगच होता. मोदी-शहा यांनी मेहबुबा मुफ्तींबरोबर भाजपचे सरकार जम्मू-काश्मीरमध्ये बनवले. ते कशासाठी? याकडेही एक शांतता राखण्याचा 'प्रयोग' म्हणूनच पाहायला हवे.
  • कश्मीर खोऱ्यातून 40,000 कश्मिरी पंडितांनी पलायन केले. त्यांची 'घरवापसी' करू व 370 कलम हटवल्यावर पंडितांना त्यांच्या घरी सहज जाता येईल असा 'प्रपोगंडा' केला गेला. तो चुकीचा आहे. एकही कश्मिरी पंडित अद्याप कश्मीर खोऱ्यात परतू शकला नाही. 'जहाँ हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है.' ही घोषणा प्रेरणादायी आहे. पाकिस्तान प्रेमींना कश्मीरातून उखडून फेकले पाहिजे. पण पाकिस्तानचा विषय हा देशातील निवडणुकांत तोंडी लावण्याचा विषय आहे. कश्मीर हा फक्त आपल्यासाठी एक जमिनीचा तुकडा नाही, त्याहीपेक्षा बरेच काही आहे.
  • कश्मीर ही हिंदुत्वाची, धर्माची भूमी आहे. देव-देवतांची भूमी आहे. आता तिकडे जमिनी वगैरे खरेदी करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. पण चार दिवसांपूर्वीच श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यास गेलेल्या तरुणांना पोलिसांनी रोखले. तिरंगा फडकवण्यास मज्जाव केला. पुणाच्या भावना दुखावतील म्हणून हा विरोध केला? तिरंगा फडकवल्याने वातावरण बिघडेल म्हणून विरोध केला का? जमिनी खरेदी करायच्या, पण त्या जमिनीवर आमचा तिरंगा फडकवता येत नसेल तर त्या जमिनीच्या तुकडय़ांचा उपयोग काय?