आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वासघातक्यांना जनतेच्या अश्रूंची किंमत चुकवायला लावू:मनपा निवडणुका लवकर घ्या; ऑगस्टमध्ये महाराष्ट्र दौरा करणार- ठाकरे

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''मी वर्षा सोडून जाताना महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी होते. या अश्रूंचे मोल मला आहे. जनतेच्या अश्रूंची किंमत या विश्वासघातक्यांना चुकवायला लावल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाही, गप्प बसू नका असा घणाघात शिंदे गटावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईकर महापालिका निवडणुकीची वाट बघत आहेत. या निवडणुका लवकर घ्याव्यात. ऑगस्टमध्ये मी महाराष्ट्र दौरा करणार आहे असेही ते म्हणाले.

महापालिकेच्या निवडणुका लवकर घ्या

ठाकरे म्हणाले, महापालिका निवडणुका लवकर घ्यायला हव्या त्या का लवकर घेऊ नये. लांबणीवर टाकता कामा नये. तमाम मुंबईकर निवडणुकांची वाट बघत आहेत.

उद्धव यांना मुख्यमंत्री करुन पवारांनी शिवसेना संपवली!:शिंदे गटाच्या आरोपांवर ठाकरेंचे सडेतोड उत्तर; म्हणाले- गावोगावी दिसते ती काय?

म्हणून ऑगस्टमध्ये दौरा करणार

उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्य ठाकरेंचे दौरे महाराष्ट्रात होत आहेत. राज्यात मी फिरेल तेव्हा सर्व नेते माझ्यासोबत फिरणार आहेत, त्यांना काम देण्यासाठी मला वेळ लागणार आहे त्यासाठीच मी आताऐवजी ऑगस्टमध्ये दौरा करणार आहे.

उद्धव ठाकरेंची तडाखेबंद मुलाखत:कर्माने मरणाऱ्यांना धर्माने मारू नका; शिंदे सत्तापिपासू, उद्या मोदींना पंतप्रधानपदही मागतील

वचन पूर्ण पण लढाई सुरुच

ठाकरे म्हणाले, हिंदुत्वात फोडाफोडी भाजपने केला, मराठी माणसांत ते फुट पाडीत आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होणार आहे. यासाठी माझी लढाई आहे. वचन पूर्ण केल्यानंतर मी दुकान बंद करणार नाही. शिवसेना मला वाढवायची आहे.

गद्दार नाही तर विश्वासघातकी

ठाकरे म्हणाले, मी महाराष्ट्राच्या जनतेचा ऋणी मी वर्षा सोडून अश्रूंचे मोल मला आहे. या अश्रूची किंमत मला आहे या विश्वासघातक्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. ते म्हणतात की, आम्हाला गद्दार म्हणू नका. मी कुठे त्यांना गद्दार म्हणतोय विश्वासघातकी म्हणत आहे.

शिंदेंनाही पायउतार व्हावे लागेल:फडणवीस उपमुख्यमंत्री ही 'उपरवाले की मेहरबानी'; अनेकांना भाजप पटत नाही, पण ते निष्ठेने काम करतात

फूट पाडण्याचा भाजपचा डाव

ठाकरे म्हणाले, शिवसेनेचे तुफान लोकांच्या मनात हृदयात तुफान आहे. मराठी माणसांत फुट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुंबईचा वेगळा घात करण्याचा भाजपचा डाव आहे. दिल्ली मिळाली तरी त्यांना मुंबई हवी आहे. रावणाचा जीव बेंबीत अशी त्यांची मुंबईबाबत गत आहे.

बातम्या आणखी आहेत...