आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:‘होळी रे होळी...  सरकारने थापली गॅसवाढीची पोळी’

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आघाडीच्या आमदारांनी गुरुवारी गॅस दरवाढप्रकरणी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “होळी रे होळी... सरकारने थापली गॅसवाढीची पोळी’, “संपला निवडणुकीचा तडाखा, झाला गॅस दरवाढीचा भडका’,“रद्द करा रद्द करा- गॅस दरवाढ रद्द करा’, “खोके सरकार आले... सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले’ अशा घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

पुण्यात नाही चालले खोके... ‘उदास झाले बोके’, ‘या सरकारचे करायचे काय... गरिबांच्या घरात जेवण नाय’, ‘शेतकऱ्यांची लाइट तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, “बळीराजाला द्या लाइट, नाही तर शेतकरी देईल फाइट’ अशा घोषणा आमदार देत हाेते.

बातम्या आणखी आहेत...