आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शाहांचा शिवसेनेवर घणाघात:'मी उद्धव ठाकरेंना बंद खोलीत कोणतेही वचन दिले नव्हते, शिवसेनेने आमच्यासोबत दगाबाजी केली'- अमित शाह

सिंधुदुर्ग6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असते तर शिवसेनाच उरली नसती'

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात अमित शाह यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात तीन चारी ऑटो रिक्षा सरकार तयार झाले आहे. सत्तेसाठी शिवेसनेने सिद्धांत मोडले आहे असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर घणाघात केला आहे.

अमित शाह म्हणाले की, 'शिवसेना नेहमी म्हणत असते की, आम्ही वचन मोडले. पण, आम्ही वचन तोडले असे खोटे बोलत आमच्या मित्राने आमच्यासोबत दगाबाजी केली आहे. आम्ही महाराष्ट्रातसह देशभरात जे जे वचन दिले ते पूर्ण केले आहे. बिहारमध्ये नितीश यांना वचन दिले होते. ते आम्ही पूर्ण केले. मी कोणतेही वचन हे सर्व जनतेसमोर देत असतो. तुम्ही म्हणता मी बंद खोलीमध्ये वचन दिले, पण मी बंद खोलीत राजकारण करत नाही, मी सर्वांसमोर वचन देतो. मी डंके की चोट पर... सर्व काही करतो.

राजकारणासाठी सिद्धांत मोडले
यासोबतच शिवेसनेने राजकारणासाठी सिद्धांत मोडले आहे असा टोलाही अमित शाहांनी लगावला आहे. याविषयी बोलताना अमित शाह म्हणाले की, 'उद्धव ठाकरेंच्या फोटोवर मोदींचे भलेमोठे फोटो लावून तुम्ही मते मिळवली आहेत. मी शिवसेनेच्या मित्रांना म्हणेल की, तुम्ही सिद्धांतासाठी राजकारण करत नाही. तुम्ही राजकारणासाठी सिद्धांत मोडत आहात. आम्ही तुमच्या रस्त्यावर चालणार नाही तुम्ही काळजी करु नका. आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असते तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती.'

तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशेला
शाह म्हणाले की, 'महाराष्ट्रात ऑटो रिक्षासारखे तीन चाकी सरकार बनले आहे. ज्याचे तीनही चाके वेगवेगळ्या दिशेने चात आहेत. एक पूर्व, दुसरा पश्चिम तर तिसरा वेगळ्या दिशेने जात आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या जनादेशाच्या विरोधात सत्तेच्या लालसेपोठी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आले आहे. जनतेने हा मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला होता.

बातम्या आणखी आहेत...