आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेलकर प्रकरणी एसआयटी:मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; डेलकरांनी महाराष्ट्रात येऊन आत्महत्या का केली? गृहमंत्र्यांनी दिले उत्तर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फडणवीस संतापले, म्हणाले - गृहमंत्र्यांनी माझीच चौकशी करावी

खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत केला जाणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली. दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह मुंबईतील एका हॉटेलमध्ये सापडला होता. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइड नोट सुद्धा लिहिले होते. त्यावरूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी झाली.

महाराष्ट्रात येऊन आत्महत्या का केली? गृहमंत्र्यांनी दिले उत्तर
सभागृहात बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणले- महाराष्ट्र शासन यावर माझा विश्वास आहे. आत्महत्या केल्यानंतर मला न्याय महाराष्ट्रातच मिळेल. म्हणून त्रास गुजरातमध्ये असला तरीही आत्महत्या मुंबईत करत असल्याचे त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. त्यांच्या पत्नी आणि चिरंजीव यांनी सुद्धा मला पत्र पाठवले आहे. त्यामध्ये सुद्धा प्रफुल्ल खेडा पटेल यांच्यावर त्यांनी आरोप केले. स्थानिक प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांनी खूप त्रास दिला. त्यामुळे, त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असे सांगितले.

डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये काही नावे समोर आली असून त्याचा तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यावरून हा भाजपला इशारा असल्याचे सुद्धा सांगितले गेले. मुख्यमंत्र्यांच्या याच दाव्याला देवेंद्र फडणवीस यांनी फुसका बार म्हटले आहे. डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजप नेत्यांचे नाव नाही असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस संतापले
मी खून केला असेल तर माझी चौकशी करा. गृहमंत्र्यांनी माझी सुद्धा चौकशी जाहीर करावी. सभागृहात सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे असे फडणवीस बोलताना दिसून आले. या दरम्यान सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा दावा फेटाळून लावताना सभागृहात थेट डेलकर यांची सुसाइड नोट फडकावून दाखवली.

उलट अँटिलिया स्फोटक प्रकरणात संशयास्पद मृत्यू झालेल्या मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी सचिन वझे यांची चौकशी करा. मनसुख यांच्या पत्नीने तसे आरोप लावले आहेत. या दरम्यान, विरोधकांनी सभागृहात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

बातम्या आणखी आहेत...