आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संकट:राज्यातील पोलिसांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या वीस कंपन्यांची केंद्राकडे मागणी-गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • राज्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या 32 कंपन्या कार्यरत आहेत

राज्यात कोरोनामुळे पोलिस दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. याखेरीज रमजान व येणारा ईद सण तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलिस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे  केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या(CAPF) वीस कंपन्यांची मागणी करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात राज्य राखीव पोलिस दलाच्या 32 कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने पोलिस दल कार्य करत आहे. मात्र पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना देखील कोरोनाची  बाधा झालेली आहे. पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे राज्यात तातडीने  केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या 20 कंपन्या मिळाव्यात अशी मागणी केली असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...