आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:गृहमंत्र्यांनी साजरा केला बंदोबस्तातील पोलिस उपनिरीक्षकाचा वाढदिवस

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांना केक कापून दिल्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा

महाराष्ट्र पोलिसातील 3 हजारांपेक्षा जास्त पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, आतापर्यंत 33 पोलिस कर्मचाऱ्यांना या विषाणूमुळे जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या या लढाईत पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख विविध प्रयत्न करत आहेत. यातच आता रविवारी संध्याकाळी पुण्यावरुन मुंबईला जाताना भर रस्त्यात एका पोलिसाचा वाढदिवस साजरा करुन दिर्घायुष्याचा शुभेच्छा दिल्या. 

रविवारी गृहमंत्री पुण्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत सामील होण्यासाठी गेलेह होते. बैठक संपवून पुण्यावरुन मुंबईकडे जाताना जुबली परिसरातील एक्सप्रेसवेवर त्यांना एक पोलिस बुध दिसला. यावेळी देशमुख यांनी गाडी थांबवली आणि तेथे उभ्या असलेल्या पोलिसांची विचारपूस केली. यावेळी देशमुख यांना कळाले की, तेथे ड्युटीवर असलेल्या पोलिस उप निरीक्षक श्रीकांत जाधव यांचा वाढदिवस आहे. यानंतर त्यांनी पोलिस पोस्टवर आधीपासूनच आणलेल्या केकला मागवले आणि जाधव यांचा वाढदिवस साजरा केला. हे पाहून जाधव आश्चर्यचकीत झाले आणि त्यांना आनंदाश्रु अनावर झाले.

बातम्या आणखी आहेत...