आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गृहमंत्र्यांचे आदेश:भाजप काळात माजी सैनिकावर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिले आदेश

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपचे सरकार असल्याने उन्मेष पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही - देशमुख

फडणवीसांचे सरकार असताना सोनू महाजन या माजी अधिकाऱ्याला मारहाण झाली होती. त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला असेही आरोप झाले होते. त्याला भाजपच्या आमदाराने मारण्याचा प्रयत्न केला असेही म्हटले जात होते. आता त्या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. यासंदर्भात अनिल देशमुख यांनी ट्विटरवर माहिती दिली.

गृहमंत्री म्हणाले की, 2016 साली भाजपचे तत्कालिन आमदार व आताचे खासदार उन्मेष पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. यासंदर्भात मला मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार पोलिसांना उन्मेष पाटील यांची या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 2016 साली हा गुन्हा घडला होता. पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. त्यानंतर 2019 मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे उन्मेष पाटील यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नसल्याचे देशमुखांनी म्हटले आहे.

शिवसैनिकांनी माजी नौदल अधिकाऱ्याला केली होती मारहाण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र व्हॉट्सअपवर फॉरवर्ड केल्याने नाराज झालेल्या शिवसैनिकांनी शुक्रवारी (दि.11 सप्टेंबर) एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली होती. निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांत गुन्हा दाखल केला. मात्र काही तासांतच आरोपींनी जामीन मिळाला होता. या हल्ल्यानंतर शिवसेनेवर विरोधी पक्षाने टीका केली आहे.