आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरण:अर्णबविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता, गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले - केंद्रानेही कारवाई करावी

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशाच्या सुरक्षेसंबंधित या संवेदनशील प्रकरणात केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे; गृहमंत्री देशमुख

बालाकाेट स्ट्राइकशी संबंधित व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणात महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गाेस्वामीविरुद्ध कारवाई करण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख मंगळवारी म्हणाले की, राज्य सरकार याबाबत कायदेशीर सल्ला घेणार आहे.

देशमुख म्हणाले, देशाच्या सुरक्षेसंबंधित या संवेदनशील प्रकरणात केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे. अर्णब यांनी शासकीय गाेपनीयता कायद्याचे उल्लंघन केले आहे. वायुदलाशी निगडित गाेपनीय याेजना कशी लीक झाली, याची चौकशी झाली पाहिजे. दरम्यान, काँग्रेसने अर्णब यांच्या अटकेची मागणी केली आहे. याआधी सोमवारी राष्ट्रवादीने अर्णब यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केंद्राकडे केली होती. अर्णब गाेस्वामी आणि बार्कचे (ब्राॅडकास्ट आॅडियन्स रिसर्च कौन्सिल) तत्कालीन सीईओए पार्थाे दासगुप्ता यांच्यात २३ फेब्रुवारी २०१९ ला व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर बालाकाेट स्ट्राइकबाबत चर्चा झाली होती. याच्या तीन दिवसांनंतर २६ फेब्रुवारी २०१९ ला भारतीय वायुदलाने बालाकोटवर हल्ला केला होता. मुंबई पोलिसांनी

बातम्या आणखी आहेत...