आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांसाठी सुरक्षेचे कवच:महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दिशा’ कायदा आगामी अधिवेशनात संमत करणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची बैठकीत ग्वाही

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बैठकीत महिला पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी

राज्यातील महिलांसाठी सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा ‘दिशा’ कायदा येत्या अधिवेशनात संमत करून घेणार, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दिली. सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित ‘दिशा’ कायदा अंमलबजावणी तसेच महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

या वेळी गृह राज्यमंत्री सतेज पाटील व शंभूराज देसाई, खा. सुप्रिया सुळे, आ. यामिनी जाधव, आ.डॉ. मनीषा कायंदे, माजी आ. विद्या चव्हाण, अति. पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्रसिंह, अति. पोलिस महासंचालक (सीआयडी) अतुलचंद्र कुलकर्णी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दिशा कायद्यासंदर्भात माता-भगिनींसाठी मोठे सुरक्षा कवच निर्माण करण्यात येत असून यासंदर्भातील मसुदा अंतिम झाला आहे. याबाबत माता-भगिनी तसेच तज्ज्ञांकडून अधिक सूचना देऊन त्याचाही अंतर्भाव यात करण्याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करून हा कायदा येत्या अधिवेशनात संमत करून घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

बैठकीत महिला पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी

स्काइपद्वारे या बैठकीत सहभाग नोंदवत विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे तसेच चारुलता टोकस यांनी आपल्या सूचना मांडल्या. उपस्थित महिला प्रतिनिधीनींही सहभाग घेऊन महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या. त्यात प्रामुख्याने महिला पोलिसांची संख्या वाढवणे, महिलांविषयक कायदे व सुविधा यांची अधिकाधिक प्रसिद्धी करणे, महिला आयोग अध्यक्ष व इतर सदस्यांच्या नियुक्त्या करणे, सोशल मीडियासंदर्भात अधिक जागरूकता, पॉस्को केसेसचा निकाल, सायबर सेफ वुमन, महिलांसाठी विशेष न्यायालयाची निर्मिती करणे, अशा विविध विषयांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...