आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राकडे बोट:भोंग्यासंदर्भात राष्ट्रीय धोरण आखण्याची गृहमंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी; हिंदू आणि मुस्लिम समुदायाचे मानले आभार

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गेल्या काही दिवसांपासुन मशिदीवरील भोंग्यांवरुन वाद सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला मशिदीवरील भोंगे उतरावे असे अवाहन केले होते. तसेच हे भोंगे न उतरवल्यास मशिदी समोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता. या मुळे राज्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्र सरकारला लाऊडस्पीकरच्या वापराबाबत धोरण आणण्याची विनंती केली आहे. शिवाय, लाऊडस्पीकरच्या वादात शांतता राखण्यासाठी राज्य सरकारला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायातील लोकांचे आभार मानले.

यापूर्वी कुठल्याही कायद्यामध्ये स्पीकर लावणे किंवा उतरवणे हे सरकारचं काम नाही, सरकारची जबाबदारी नाही. ज्याला लाऊड स्पीकर लावायचा आहे, त्याला पोलिसांनी परवानगी घेऊनच लाऊड स्पीकर लावता येतील, अशा स्पष्ट शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. तसेच भोंगे उतरविण्याची सरसकट कारवाई करणे राज्य सरकारला शक्य नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या यासंदर्भातील निर्णयाचे पालन करावे लागेल. एका विशिष्ट समाजासंदर्भात भूमिका घेताना त्याचे परिणाम खेडेगावात होतील. वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळी भूमिका घेता येणार नाही. सर्वांसाठी एकच भूमिका घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले होते.

भोंगा वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वारंवार बैठका घेत दोन्ही समुदायाला शांततेचे आवाहन केले होते. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा बंदोबस्त ठेवला होता. सरकारच्या आवाहनानंतर राज्य भरातील अनेक मशिदींनी भोंगे उतरवले तसेच अनेक मशिदींनी भोंग्यांचा आवाज मर्यादित ठेवला. तसेच अनेक ठिकाणी या विषयावरुन जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी दोन्ही समुदायांनी सामंजस्य दाखवले.

भोंग्यांबाबत कायदा काय सांगतो?
भारतात लाऊडस्पीकरच्या वापराचे नियम आणि निर्बंध समान आहेत असे कायदेतज्ज्ञ सांगतात. "ENVIRONMENTAL PROTECTION ACT 2000 नुसार आवाजाचे नियम आहेत. धार्मिक स्थळांना यातून सूट आहे असे काही नमूद केलेले नाही. केवळ राज्य सरकारकडे रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यासाठी वर्षातून 15 दिवस सूट देण्याचे अधिकार असतात. उत्सव, सभा अशा काही कारणांसाठी सरकार परवानगी देऊ शकते. काही सांस्कृतिक कार्यक्रम अथवा सणांच्या वेळेस राज्य सरकार रात्री 10 ते 12 वेळात लाऊडस्पीकरच्या वापराला परवानगी देऊ शकते, पण ते दिवस आधीच जाहीर करावे लागतात. सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा त्या ठिकाणच्या नेहमीच्या आवाजापेक्षा जास्तीतजास्त 10 डेसिबल वर तसंच 75 डेसिबलपेक्षा जास्त असू शकत नाही. खासगी जागेसाठी ही मर्यादा 5 डेसिबलची आहे.

बातम्या आणखी आहेत...