आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये:दिल्ली पोलिसांनी अटक केलेला एक दहशतवादी धारावीतील, गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेल्वे पोलिसांची एक महत्त्वाची बैठक रेल्वे मुख्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा धारावीतील असल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केली असल्याची माहिती देखील समोर येत आहेत. आता या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी संध्याकाळी पाच वाजता एक तातडीची बैठक बोलावली आहे. यामध्ये ते मुंबई पोलिस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. तर दुसरीकडे रेल्वेनेही उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

आज बोलावण्यात आलेल्या बैठकीविषयी स्वतः दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, दिल्लीमध्ये सहा अतिरेक्यांना अटक करण्यात आली ही संवेदनशील घटना आहे. देशाच्या स्तरावरील ही घटना आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाची एक बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीतील कायदेशीर माहिती घेतल्यानंतरच अधिक भाष्य केले जाईल. यावर आताच बोलणे योग्य, असे देखील दिलीप वळसे-पाटील म्हणाले आहेत. यासोबतच या बैठकीला पोलिसांच्या सर्व युनिटचे मोठे अधिकारी देखील उपस्थित असणार आहेत.

दरम्यान दिल्लीमध्ये पकडलेले दहशतवादी हे मुंबई लोकलमध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणण्याचा प्लान करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामुळे रेल्वे प्रशासन देखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. यामुळेच आता रेल्वे पोलिसांची एक महत्त्वाची बैठक रेल्वे मुख्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे. रेल्वे आयुक्त कैसर खालिद यांच्यासह डीआरएमचे मोठे अधिकारी देखील यावेळी उपस्थित असणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत रेल्वेच्या सुरक्षेवरही चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...