आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ बाॅंम्ब:फडणवीसांच्या व्हिडिओ बाँम्बवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सायंकाळी पाच वाजता देणार उत्तर, काय बोलणार याकडे लक्ष

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्हिडिओ बॉम्ब फोडल्यानंतर त्यावर आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील विधानसभेत उत्तर देणार आहेत. सायंकाळी हे उत्तर देणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

फडणवीसांच्या उत्तरांना लक्ष्यवेधीनंतर उत्तर द्यायचं की आधी हे समन्वय समितीच्या बैठकीत ठरले असून लक्ष्यवेधीनंतर उत्तर देण्यात येणार आहे, सायंकाळी पाच वाजता हे उत्तर गृहमंत्री देणार असल्याबाबत महाविकास आघाडीची समन्वय समितीची बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे.

बैठकीत उत्तर किती वाजता द्यायचे, उत्तरात काय असेल याचेही डावपेच बैठकीत आखले गेले आहेत. यावर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, उत्तर काय असेल हे उत्तर ऐकल्यानंतरच समजेल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दिलीप वळसे पाटील नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून सायंकाळी पाचपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

काही दिवसांपुर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात सरकारी वकिलाकडून होत असलेल्या कथित षडयंत्राचा पर्दाफाश केला होता. त्याबाबतचे व्हिडीओ पुरावे एका पेन ड्राईव्हमधून त्यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले होते. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.

आम्ही अजून बॉम्ब टाकणार - चंद्रकांत पाटील

आम्ही अजून बॉम्ब टाकणार असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यालाही वळसे-पाटील यांनी उत्तर दिलं आहे. त्यांच्याकडे किती बॉम्ब आहेत आणि ते कशाकशावर फोडणार हे त्यांनाच माहीत, असा टोला त्यांनी पाटील यांना लगावला आहे.

फडणवीस काय म्हणाले होते?

गिरीश महाजनांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला. 2021 मध्ये असा गुन्हा दाखल केला की 2018 मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या एका वादाबाबत भोईटे गटाच्या वतीनं महाजनांची स्वीय सहायक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या एकाचं अपहरण केलं. मग गिरीश महाजनांचा फोन आला त्यांनी धमकी दिली. त्या आधारावर त्याला सांगण्यात आलं की तू त्या विद्या प्रसारक मंडळाचा राजीनामा दे. त्यावर आम्हाला यायचं आहे. अशाप्रकारची अत्यंत बनावट केस तयार केली. त्या पलिकडे जाऊन गिरीश महाजनांचा मकोका लागला पाहिजे म्हणून तशी कागदपत्र गोळा केली गेली. पण महाजनांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं.

बातम्या आणखी आहेत...