आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाब मलिक प्रकरण:तुरूंगात गेलेला माणूस खंगून खंगून मरेल, हा शाप भाजप नेत्यामागे आयुष्यभर राहील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रखर टीका

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावरील कारवाईनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. सध्या या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी आणि भाजपतील वाढता संघर्ष जनतेला नवा राहिला नाही. यात जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर प्रखर टीका केली. कुणाचे तरी आयुष्य बेरंग करणाऱ्यांला देवही माफ करीत नाही,आत गेलेला माणूस कदाचित खंगून खंगून मरेलहीपण हे शाप आयुष्यभर तुमच्यामागे राहतील अशी टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केली आहे.

भाजपकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या मुद्द्यावरून विरोधक आक्रमकही झाले. मात्र महाविकास आघाडीकडून भाजप ईडी-सीबीआयचा गैरवापर करून इतर पक्षांवर दबाव आणत असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज धुळवडीच्या निमित्ताने गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे.

मुंबईची जबादारी कार्याध्यक्षांवर

नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या मुळे मलिक यांच्याकडील जबादारी पक्षातील अन्य नेत्यांवर देण्यात येत आहे. यात ते मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे. तर राखी जाधव आणि नरेंद्र राणे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने हे बदल करण्यात आले आहेत. तर परभणीचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी आता धनंजय मुंडे आणि गोंदियाचे पालकमंत्री पदाची जबाबदारी प्राजक्त तनपुरे यांच्या वर देण्यात येणार आहे.

देव माफ करणार नाही
कुणाचे तरी आयुष्य बेरंग करणाऱ्यांला देवही माफ करत नाही, प्रत्येकाचे आयुष्य सप्तरंगी असते. ते आयुष्य बेरंग करून टाकायचे त्याच्या मुला-बाळांचे आयुष्य बेरंग करून टाकायचे. त्याच्या आयुष्यात काजळी यावी असे काहीतरी करायचे. ठीक आहे. काही दिवसांसाठी हे बरे वाटेल. आत गेलेला माणूस कदाचित खंगून खंगून मरेल सुद्धा. पण हे शाप आयुष्यभर तुमच्यामागे राहतील”, असे आव्हाड ;यांनी म्हंटले आहे. हा निशाणा अप्रत्यक्षपणे ईडी-सीबीआय आणि भाजपवर असल्याचे बोलले जात आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड पत्रकारांशी संवाद साधत असताना, त्यांच्या मागे उभे असलेले कार्यकर्ते ईडीच्या बैलाचा ढोल.., अशा घोषणा देत होते.

माझ्या बोलण्यात अनेकदा शिव्या असतात - आव्हाड
मी बोलताना माझ्या बोलण्यात अनेकदा शिव्या असतात. माझ्या कार्यकर्त्यांना त्याबद्दल माहिती आहे. गेली ३० ते ३५ वर्षे मी असाच बोलतो, पण माझे कार्यकर्ते त्याचे वाईट वाटून घेत नाही. कारण त्यांना माहिती आहे, मी जे बोलतो ते रागात बोलतो. वाट्टेल ते बोलणे माझ्या स्वभावात आहे. असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...